डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारतीच्या दुरूस्तीची मागणी
श्रीगोंदा / प्रतिनिधी । शहरातील सिद्धार्थनगर येथे सन 1932 साली पुणे कर्जत प्रवासादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थांबले असल्याचे शासनाच्या एका प्रकाशित खंडामध्ये नमूद केलेले आहे. त्यानुसार काही प्रत्यक्षदर्शी लोकांच्या माहितीनुसार श्रीगोंद्यातील सिद्धार्थनगर येथील मोठ्या वडाच्या झाडाखाली बाबासाहेब थांबले व त्यांनी येथील लोकांशी संवाद साधल्याचे सर्वांना ज्ञात आहे.
यावरून येथील समाबांधवांनी दोन एकर क्षेत्र बाबासाहेबांचा पावलाने पावन झालेल्या जागेत राखून ठेवले, व त्या क्षेत्राला जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सभापतींनी सदरील जागा आरक्षित केली. यानुसार सर्वसामान्यांच्या स्मारकाच्या मागणीनुसार श्रीगोंदा नगरपालिकेने येथील समाजातील जाणकारांच्या मागणीवरून सभेत ठराव करून सुमारे 90 लाख रुपयांचा निधीं सर्वानुमते मंजूर करून बांधकाम करण्यात आले. हा सर्व निधी येथे वापरण्यात आला, मात्र निधी अपूर्ण पडल्याने दोन वेळेस अतिरिक्त 10 लाख रुपयांचा निधी नगरपालिकेच्या स्थानिक सभेने मंजूर करून एक अवाढव्य अशी अपेक्षीत इमारत उभा केली आहे.
मात्र सदरील इमारत ही, अनेक सुविधांपासून वंचित असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास घोडके व मिलिंद घोडके यांचे मत आहे. यात पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, सदरील स्मारकात वीज जोडलेली नाही, पाण्याची सुविधा नाही, याठिकाणी खिडक्यांना बसविलेल्या बहुतांश काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत, या स्मारकाच्या व्यवस्थापणेसाठी कमिटीची आवश्यकता असल्याचे यांचे मत आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या देखभालीसाठी हंगामी शिपाई नेमून, इमारतीचा दुरूपयोग करणार्यांवर कारवाईसाठी नगरपालिका विभागाकडून निरीक्षक नेमावा अशीही याठिकाणी मागणी होत आहे. या स्मारकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असे नामकरण करावे. तसेच इमारतींच्या प्रवेशद्वारासमोरील जूनी भिंत पाडून प्रवेशद्वारात वृक्षारोपण करून सुशोभित करावे. अंतर्गत व बाहेरील रुक्षारोपणासाठी नगरपालिकेने अतिरिक्त निधी उपलब्ध करावा. त्याचबरोबर शेजारील जिल्हापरिषदच्या व स्मारकाच्या दरम्यान भिंत तयार करावी, स्मारकाचा प्रवेश मुख्य प्रवेशद्वारामार्फत करावा. अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पत्रकारांशी वार्तालाप केलेला आहे.
वरील मागण्यांच्या अनुशंगाने श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांशी फोनवर संपर्क साधून, सदरील मागण्याविषयी विचारले असता, यासर्व मागण्यांसाठी स्थानिक सभेत ठराव करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.