कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाने शेतकर्यांना दिलासा
कुळधरण / प्रतिनिधी । कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुटल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला येसवडी चारीला पाणी सुटले आहे. आवर्तनामुळे पिकांना ऐन टंचाईत पाणी मिळत आहे. आवर्तनाच्या पाण्यातुन शेततळे भरुन घेण्यासाठी शेतकर्यांची अहोरात्र लगबग सुरु आहे.
कुळधरण येथुन जात असलेल्या येसवडी (डीवाय 16) चारीला सध्या पाणी सुटले आहे. यावेळी टेल टु हेड पाणी वाटपाचे बर्यापैकी नियोजन होत असल्याने धुमकाई फाटा, बारडगाव, येसवडी भागापर्यंत पाणी पोहोचले आहे.त्यानंतर तळवडी, धालवडी, कुळधरण भागात पाणी मिळणार आहे. राक्षसवाडी येथे शांतीलाल कोपनर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी पाण्याचे समान वाटप करण्याच्या सूचना अधिकार्यांना देत पाण्याचे नियोजन सांगितले. भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर यांनी याबाबत पालकमंत्र्यांना समान पाणी वाटपाची मागणी केली होती. येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष बापूराव सुपेकर, मोहन सुपेकर आदींनी पाण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथे जावुन भेट घेतली होती. नियमित व पुरेसे पाणी मिळत नसल्याने संघर्ष समितीच्या सदस्यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना निवेदन देवून या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे येसवडी चारी पाण्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला होता. कुळधरण गटातील राजकारणावर परिणाम करणारा हा प्रश्न असल्याने सर्वच पक्षाचे नेते याकडे विशेष लक्ष ठेवुन आहेत.
सध्या सुटलेल्या आवर्तनाचा शेतातील ऊस, भूईमुग, कलिंगड, हरभरा, मका, कडवळ आदी पिकांना दिलासा मिळत आहे. डीवाय 15 चारीला अजुन पाणी सुटण्याची प्रतीक्षा आहे. पाणी सुटताच या चारीवरील कोपर्डी, राक्षसवाडी, कुळधरण या भागातील क्षेत्र भिजले जाणार आहे. आवर्तनामुळे टॉमटो, काकडी तसेच डाळींब, द्राक्षे आदी फळबागांनाही फायदा होत आहे. अनेक शेतकरी शेताजवळील नाले, बंधारे भरुन घेण्यासाठी धडपड करीत आहेत. तर काही शेतकर्यांनी विहिरीतच आवर्तनाचे पाणी सोडुन पाण्याचा साठा करुन ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. आवर्तनामुळे भुजलपातळीत वाढ होत असुन त्याचा पाऊस पडेपर्यंत पाणी राहण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.सिंचनाच्या ठिबक तसेच तुषार पध्दतीचा वापर करुन शेतकरी पाण्याची बचत करीत आहेत.
टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही
वायसेवाडी येथे येसवडी चारीचे टेल आहे. मात्र अजूनही येथे पाणी आले नसल्यामुळे टेल टु हेड पाणी वाटप होताना दिसत नाही. वायसेवाडी येथील गवळीवाड्याच्या छोट्या तलावापर्यंत पाणी पोहोचल्यास या भागातील शेतकर्यांची पिके वाचवता येतील. अधिकारी राजकीय पुढार्यांचे ऐकून पाण्याचे असमान वाटप करतात याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे.
- प्रा. अशोक पावणे,
सल्लागार, येसवडी चारी संघर्ष समिती
शेततळे भरण्याची लगबग
आवर्तन सुरु आहे तोपर्यंत शेततळ्यात पाणी भरुन घेण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. वीजेचे भारनियमनामुळे शेततळे भरुन घेण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेक शेतकर्यांनी कमीत कमी दिवसात अधिकाधिक पाणी उपसा करुन शेततळे भरण्यासाठी ट्रॅक्टरलाच मोठे पंप बसवुन घेतले आहेत.अनुदानाअभावी शेततळ्याची कामे अर्धवट राहिलेले शेतकरी मात्र चिंतेत आहेत.