Breaking News

माळी महासंघाच्या शहराध्यक्षपदी शिंदे


संगमनेर : अखिल भारतीय माळी महासंघाच्या संगमनेर शहराध्यक्षपदी येथील ऋषिकेश शिंदे यांची निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या बैठकीत महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजाराम काठे यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे अरूण थोरात, दिपक मंडलिक, नितीन शेलार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यानिवडीबद्दल नगरसेवक दिलीप पुंड, नितीन अभंग, माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके, प्रसाद गोरे, अमित मंडलिक, संदीप शिंदे, अतुल अभंग, सागर थोरात, निलेश पावबाके यांनी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.