Breaking News

शेवटच्या टप्प्यातही हापूस वधारलेलाच


सिंधुदुर्ग - देवगड तालुक्यामध्ये हापूस आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेवटच्या टप्प्यात मोठया प्रमाणात हापूस आंबा उत्पादन झाले आहे. मात्र, मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याचा दर उतरल्याने आंबा बागायतदारांना अन्य बाजारपेठांचा पर्याय निवडावा लागला आहे. स्थानिक बाजारपेठेत हापूसचा दर अजूनही वधारलेला असल्याने स्थानिकांच्या अजून आवाक्यात आलेला नाही.

देवगड-जामसंडे शहरात मुख्य महामार्गालगत सर्वत्र आंबा विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. हापूस आंब्याची पाच डझनची पेटीचा दर अजून 1500 ते 1200 या दरम्यान आहे. 300 पासून 150 रुपयापर्यंत डझनाचा दर असून चाकरमानी व पर्यटक आंबा खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा असल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले असल्याने आंबा बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. अजून पाच ते सहा दिवस आंबा हंगाम तेजीत राहणार आहे.