Breaking News

दुचाकीसह डिक्कीतील 4 लाख लंपास


कर्जत : येथील आठवडे बाजाराच्या दिवशी भरदिवसा कर्जतच्या बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरून नेवून डीक्कीतील रोख रकम 4 लाख रूपये लंपास करण्यात आले.
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कर्जत शहरातील बसस्थानकासामोरिल जगदंबा भेळ सेंटरजवळ तात्यासाहेब ढोबे (रा. टाकळी खंडेश्‍वरी ता. कर्जत) यांनी आपली अ‍ॅक्टिवा दुचाकी क्र (एमएच 16 बीडी 121) ही उभा केली होती. कामानिमित्त ते एका दुकानात गेले असता, त्यांची दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेत डिक्कीमधील असणारी 4 लाख रुपयांची रक्कम लंपास करत पोबारा केला. 

सदर दुचाकी बस स्थानक समोर असणार्‍या शासकीय रूग्णालय परिसरात सोडून दिली. तात्यासाहेब ढोबे हे ग्रामविकास अधिकारी म्हणुन पंचायत समिती कर्जत येथे कार्यरत आहेत. यांच्या फिर्यादीनुसार कर्जत पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पो.नि. राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नरसिंग शेलार हे करीत आहेत.