Breaking News

तिखोल येथे निलेश लंके प्रतिष्ठाणची स्थापना


सुपा : पारनेर तालुक्यातील तिखोल येथे निलेश लंके प्रतिष्ठान शाखेचे उद्घाटन पारनेर-नगर तालुक्याचे लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर पंचायत समितीचे सदस्य, उद्योजक सुरेश धुरपते यांनी भूषविले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यार्ंना सूचना केल्या की, प्रतिष्ठानमार्फत आपण जी समाजोपयोगी कामे करत आहोत ती कामे या पुढील काळामध्ये मोठया प्रमाणात करत राहावी. समाजातील सामान्य जनतेला प्रतिष्ठानच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सदैव करत राहावे. 

प्रतिष्ठानमार्फत आपण पोखरी येथील आरोग्य शिबीर असेल, टाळळी ढोकेश्‍वर येथे पाणी टँकर, नांदूर पठार येथील पाणी फाऊंडेशन कामासाठी निलेश लंके प्रतिष्ठानमार्फत रुपये. 25 हजार रूपयांची देणगी देण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, निघोज गावचे सरपंच ठकाराम लंके, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शिर्के, समर्थ कॉलेजचे संस्थापक संचालक कैलास गाडीलकर, युवा नेते विजू औटी, शिवसेनेचे माजी जवळा गण प्रमुख संदिप सालके, जामगावचे सरपंच दिनकर सोबले, सा. कार्यकर्ते शशी आंधळे, मावळेवाडीचे कांतीलाल भोसले, हंगा गावचे माजी सरपंच संताराम दळवी, टाकळी ढोकेश्‍वरचे महेश झावरे, सुहास बांडे, दत्ता निवडुंगे, सुदाम लोंढे, बाजीराव कारखीले, बैरू होळकर, संदिप पवार, पोटघन मेजर, सतीश भालेकर, अनिल गंधकते, सत्यम निमसे, साठे मेजर, जे.के. मेजर आदिंसह निलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्त्यांसह तिखोल गावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.