Breaking News

उपसभापती निकोलेंचा आशुतोष काळेंनी केला सत्कार


कोपरगाव ता. प्रतिनिधी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी राजेंद्र निकोले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड करून काम करण्याची संधी दिल्याबद्दल निकोले यांनी माजी आ. अशोक काळे, युवा नेते आशुतोष काळे यांना धन्यवाद दिले. या पदाची जबाबदारी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडू, असे निकोल यांनी सांगितले. यावेळी गौतम बँकेचे माजी संचालक दिलीप गायकवाड, जिनिंग प्रेसिंगचे संचालक गणेश गायकवाड, संजय निर्मळ, प्रमोद कोल्हे, भाऊसाहेब आहेर, माणिक तेलंगे, गोरक्षनाथ म्हस्के, अशोक घोलप, गोरख क्षिरसागर आदी उपस्थित होते.