Breaking News

भंडारा-गोंदियात 49 ठिकाणी आज फेरमतदान गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांची तडकाफडकी बदली

भंडारा : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या बिघाडामुळे फेरमतदान होणार आहे. येथे सोमवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. भंडारा-गोंदिया येथील पोटनिवडणुकीत जवळपास 49 ठिकाणी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. आता याठिकाणी फेरमतदान होणार आहे. आज बुधवारी मतदान होणार असून परवा मतमोजणी होईल. जवळपास 25 टक्के ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला होता. याठिकाणी मतदारांनीही फारसा उत्साह दाखवला नव्हता. त्यामुळे केवळ 42 टक्क्यांच्या आसपासच मतदान झाले होते. दरम्यान, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे पदभार होता. मात्र ईव्हीएम मशीनमधील बिघाडाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, तसेच व्हीव्हीपॅटचा घोळ समोर आल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत - बलकवडे यांची भंडारा गोंदिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून बलकवडे यांना तात्काळ रुजु होण्याचे आदेश शुध्दा मिळाले असल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रकरण असे आहे की,भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी करिता मतदान पार पडले. मात्र काल, जवळपास 100 च्या वर मतदान केंद्रावरील मशिनस काही काळ बंद होत्या. त्यामुळे यांचा परिणाम मतदानावर झाला होता. आज गोंदिया जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.