Breaking News

बारावी परीक्षेचा आज निकाल दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज बुधवारी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये 2018 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून 14 लाख 45 हजार 132 विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या 4 लाख 89 हजार, विज्ञान शाखेच्या 5 लाख 80 हजार तर वाणिज्य शाखेच्या 3 लाख 66 हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.
या ुुु.ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या निकालासोबतच विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. या निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईलवर पाहण्यासाठी बीएसएनएलच्या मोबाईल प्रोवाईडर वर 57766 या नंबरवर एसएमएस करून उपलब्ध करून घेता येणार आहे. यासाठी त्यांना चककडउ स्पेस सीट नंबर टाईप करुन 57766 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. बारावीच्या ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसर्‍या दिवसापासून गुण पडताळणी आणि छायाप्रतिसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 31 मेपासून 9 जून या कालावधीदरम्यान विहित शुल्कात अर्ज करता येणार आहे. यासाठी विलंब शुल्कासह 19 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी श्रेणी अथवा गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिली आहे, त्यांना जुलै-ऑगस्ट आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2019 या दोनच परीक्षांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. याबाबतची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.