समृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहणार: वैभव पुरनाळे
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून गावातील अनेक सार्वजनिक व वैयक्तिक कामं पूर्णत्वास नेली आहेत तर काही चालू आहेत.येत्या काही दिवसात जलसंधारण व कृषीविषयक योजनां संदर्भातील विषयावरही आम्ही काम करणार आहोत.'घेतला वसा टाकणार' नाही या उक्ती प्रमाणेच लोकनियुक्त सरपंच पदाचे सर्व अधिकार वापरून 'लोककल्याणा'साठी सदैव तत्पर राहील.
या सत्कार समारंभाचे आयोजक तथा आत्मनिर्धार फाऊंडेशन चे समन्वयक संतोष शिंदे म्हणाले, वैभव यांनी 'अभिनव युवा प्रतिष्ठाण' च्या माध्यमातून भगूर व शेवगाव परिसरात तरुण मित्रांचे मोठे संघटन उभारून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले.या त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊनच भगूरकरांनी वैभवला आपला कौल दिला.राजकारणात वैभव सारख्या सुशिक्षित व सामाजिक जाण असणाऱ्या तरुणांची खरी गरज आहे.असेच तरुण सुस्त व बेशिस्त झालेल्या प्रशासनाकडून लोकोपयोगी कामं करून घेऊ शकतात.
