Breaking News

आंतरजातीय विवाह , जिल्ह्यातील 297 दाम्पत्यांना अर्थसहाय्य


पुणे - आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ अनेक दाम्पत्यांना मिळत आहे. त्यामुळे समाज एकत्र होत आहे. तसेच दाम्पत्यांच्या संसाराला या अर्थसहाय्यामुळे काहीसा हातभर मिळत आहे. 2017-18 या वर्षात पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील 297 दाम्पत्यांना या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात आले आहे, अशी माहिती सामाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

समाजामध्ये समतेची भावन रुजावी, त्यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, जातीपातीचे समूळ निमृलन व्हावे यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देणे’ ही योजना सुरू केली. त्यामध्ये आंतरजातीय विवाह करणार्‍या दाम्पत्यांना 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. राज्यात अनेक जाती-पाती आहेत. प्रत्येक जातीच्या रूढी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लग्न करायचे तर आपल्याच जातीमध्ये अशा पायंडा सर्व समाजाने पाडून घेतल्याचे पहायला मिळते. परंतु, सध्या हा पायंडा मोडीत निघाला असून, जात-पात न पाहाता लग्न करणारे काही तरूण-तरूणी पुढे आले आहेत. त्यामध्ये या दाम्पत्यांना समाजाकडून त्रासही सहन करावा लागत आहे.