Breaking News

बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, असे आश्‍वासन मोदींनी कधीच दिले नव्हते!


पुणे - देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच दिले नव्हते, असे घुमजाव खा. अमर साबळे यांनी केले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात देखील अशा प्रकारचे कधीच म्हटलेले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आज 4 वर्षे पूर्ण केल्याने केंद्र सरकारच्या योजनेबाबत माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवडतर्फे खा. साबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात 15 लाख जमा होतील असे आश्‍वासन मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. याबाबत बोलताना त्यांनी विरोधक आणि काँग्रेसनेच तसा अपप्रचार केल्याचा आरोप केला आहे.