सर्वसामान्य लोकांना कमी वेळेत शिधापत्रिका द्या – अभिषेक शेळके
शिर्डी, शासन प्रत्येक नागरिकाला शिधापत्रिका दिली जाईल अशी घोषणा सरकार एकीकडे करते दुसरीकडे मात्र याच शिधापत्रिका व रेशन कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना राहाता तहसीलमध्ये मोठे हेलपाटे मारावे लागतात. गोर-गरीब व वंचित घटकातील लोक आपला रोजगार बुडवून यासाठी पाठपुरावा करीत असतात. मात्र शासन नियमाच्या किचकट अटी यानियमावलीमुळे आधारकार्ड असताना ही नवीन रेशनकार्ड मिळविणे, नाव कमी करणे, नवीन नाव टाकणे, व खराब झालेले रेशनकार्ड दुसरे मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होत असून या प्रश्नात राहाता तहसीलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कमीत कमी वेळेत रेशनकार्ड कसे मिळतील त्यातील अडचणी कशा दूर होतील यासाठी लक्ष घालण्याची गरज असून या संदर्भात तत्काळ कारवाई करावी. अशी मागणी शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शिर्डी शहर कार्याध्यक्ष अभिषेक सुरेश शेळकेयांनी एका निवेदनाद्वारे केली आहे