Breaking News

साईसंस्थानमध्ये रिक्त जागा नसल्याचा अनुकंपा पात्र वारसांना फटका


शिर्डी/(किशोर पाटणी) :साईबाबा संस्थान शिर्डीमध्ये वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणावर कामगार काम करतात हे करीत असताना ज्या कामगारांचा अकाली मृत्यू झाला त्यांच्या वारसांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी २००८ सालापासून पाठपुरावा केलेला आहे. घरातील करता माणूस अकाली निघून गेल्यानंतर कुटुंबाची मोठी ओढाताण होते. अशा वेळी ज्याठिकाणी घरातील व्यक्ती काम करते त्या संस्थानने सहानुभूती पूर्वक कमी काळात जर वारसांना नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न केला तर वारसांचे पुढचे जीवन सुकर होत असते मात्र संस्थानमध्ये रिक्त जागा नसल्याचा फटका या वारसांना बसला असला तरी त्यातून संस्थानच्या व्यवस्थापनाने २००० ते २०१८ पर्यंत ५२ जनांच्या यादीतील ३१ जणांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असा तरी इतर राहिलेल्या लोकांना ही कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता आणि विश्वस्त मंडळाकडून न्याय मिळणार तरी कधी असा सवाल या कामगारांच्या वारसाच्या कुटुंबाकडून विचारला जात आहे.

ज्या संस्थानच्या प्रगतीत चांगली सेवा देऊन योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना रोजगार देण्यासाठी संस्थानकडून होणारा उशीर हे कामगारांच्या कुटुंबाचे नाराजीचे कारण ठरत आहे सन २००८ सालापासून जे कामगार मयत झाले अशा ५२ वारसांनी २०१८ साला पर्यंत अनुकंपा तत्वावर काही कुटुंबातील मुलांनी तर काही कामगारांच्या पत्नीनी यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र संस्थानकडे जागा रिक्त नाही कामगार पॅटर्ननुसार जागा रिक्त झाल्या तर संधी मिळू शकत होती. असे असताना काहींची शैक्षणिक पात्रता तर काहींचा वशिला कमी पडल्याने या अनुकांपांच्या वारसांना फटका बसला. आणि त्यांना अशा ३१ उमेदवारांना ठेकेदारी पद्धतीवर या १० वर्षात कामावर घेतले गेले त्यातील राहिलेल्या २३ पैकी ११ वारसांनी संस्थानकडून न्याय मिळत नाही होणारा उशीर आणि नौकरीची संधी मिळण्याची अपेक्षा सोडून दिलेल्या ११ लोकांनी पाठपुरावा करणे सोडून दिले जे १२ कामगार जे नौकरीसाठी पाठपुरावा करीत आहे. त्यांना संधी न मिळाल्यामुळे उमेदवाराचे वाढणारे वय घरातून निघून गेलेला कर्ता पुरुष आर्थिक परिस्थिती गरिबीची काहींना राहण्याचे घर ही नाही अशा कुटुंबांना संस्थानच्या कीचकट नियमावलीचा फटका बसला असे म्हणावे लागेल कामगार विभागाकडून याबाबत माहिती घेतली असता ५२ पैकी ३१ जणांना संधी मिळाली १२ लोकांचा पाठपुरावा चालू आहे ११ जणांनी याबाबत फार काही चौकशी केलेली नाही हे खरे असून या उमेदवारांची शासन नियमावली अस्थापना त्यांची शैक्षणिक पात्रता हे पाहून प्रस्ताव पाठविलेला आहे.