Breaking News

वीर एकलव्यांचे विचार आचरणात आणा : ढवळे


लोणी, वीर एकलव्यांचा विचार आचरणात आणला तर आदिवासी समाजाला योग्य दिशा मिळेल. आदिवासी समाजाने आता जागृत झाले पाहीजे. मुलांना उद्याचा सजग नागरिक घडविण्यासाठी शिक्षणापासून वंचित ठेवू नका. आदिवासी म्हणजे अंगठा देणारी माणसं नसून राज्य प्रस्थापित करणारे एकलव्य आहोत. आता अंगठा देण्याची नव्हे तर अंगठा घेण्याची तयारी ठेवावी आणि एकलव्यांचे विचार आचरणात आणावे, असे प्रतिपादन एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले. 
लोणी येथे विर एकलव्य जयंती निमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या जयंती सोहळ्यात आरपीआयचे सुरेंद्र थोरात, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अध्यक्षा शैलजा साबळे, डॉ. डांगे, किशोर ब्राम्हणे, एकलव्य संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास माळी, राहाता तालुकाध्‍यक्ष अनिल रोकडे, नामदेव पवार, आरपीआयचे लोणी शहर अध्‍यक्ष संतोष पारखे, लोणी अध्‍यक्ष अमोल जगधने, अर्जुन बोरसे, अनिल मोरे, आरपीआयचे संगमनेर अध्‍यक्ष आशिष शेळके, कुंदन माळी, सचिन सोनवणे, विजय मोरे, विजय सोनवणे, तान्हाजी खैरे, विजय जाधव, विलास मोरे, रामा पवार, जालिंदर गवळी, विक्रम माळी, मिलीद मोरे, रामदास बडे आदींसह संघटनेचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

यावेळी सुरेंद्र थोरात, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अध्यक्षा शैलजा साबळे, डॉ. ढांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सायंकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे व मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते. जयंतीदिनाचे औचित्य साधून एकलव्य संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास माळी यांच्या संपर्क कार्यालयाचेही यावेळी उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन कुंदन आरोडे यांनी केले.