Breaking News

विस्कळीत आवर्तनाचा आशुतोष काळेंनी विचारला जाब.


कोपरगाव, मागील तीन आठवड्यांपासून गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात होते. उन्हाची तीव्रता वाढली असून शेतातील चारापिके व फळबागा जळून पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. तरीही पाटबंधारे खात्याचे अधिकारी चा-या सोडायला तयार नाहीत. अशा आशयाच्या तक्रारी शेतक-यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्याकडे केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत काळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतक-यांसह पाटबंधारे कार्यालयावर जावून धडकले. गोदावरी उजवा तट कालवा राहाता उपविभागाचे उपअभियंता कासम गोटूवार यांना त्यांनी जाब विचारून खडे बोल सुनावले. 
काळे यांनी विचारले, आवर्तनाची घोषणा तुम्हीच करता मग अंमलबजावणी का करीत नाही? शेतकरी पाटबंधारे विभागाच्या निर्णयानुसारच नियोजन करतात. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील खालच्या भागातील शेतकरी म्हणतात वर पाणी चालू आहे आणि वरच्या भागातील शेतकरी म्हणतात खाली पाणी चालू आहे. प्रत्यक्षात मात्र वरच्या आणि खालच्या शेतक-यांना पाणी मिळाले नाही. मग हे पाणी गेले कुठे? की मात्र काळेंच्या या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर उपअभियंता कासम गोटूवार यांच्याकडून मिळाले नाही. त्यावेळी काळेंनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. 

पाटबंधारे खात्याचे अधिकारी एका शेतक-याचे १६ एकर शेतीला पाणी देतात. पण त्या शेतक-याच्या शेजारील शेतक-याच्या तीन एकर शेतीसाठी पाणी देत नाही, हा शेतक-यांवर अन्याय आहे. आवर्तनाचे सर्वच नियोजन कोलमडले आहेत, असा आरोप काळे यांनी केला. कारणे सांगू नका पाणी मागणी अर्ज दाखल केलेला एकही शेतकरी आवर्तनापासून वंचित राहता कामा नये. आवर्तनाचा लाभ हा सर्व शेतक-यांना समान पद्धतीने मिळालाच पाहिजे. जर शेतक-यांवर अन्याय होणार असाल तर होणा-या परिणामांना तयार रहा, असा सज्जड इशाराच युवा नेते काळे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना यावेळी दिला. 

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन राजेंद्र गिरमे, सचिन रोहमारे, संचालक सुनील शिंदे, नंदकुमार सदाफळ, बाबासाहेब कोते, अण्णासाहेब कोते, प्रमोद चौधरी, मधुकर औताडे, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात, दीपक वाघ, नपावाडीचे उपसरपंच राजेंद्र धनवटे, दिलीप चौधरी आदींसह कोपरगाव राहाता तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.