कर्जत तालुक्यातील वाकणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या प्रयत्नातुन ही किमया साधली आहे.सरपंच वर्षा तापकीर, उपसरपंच लक्ष्मी तापकीर, माजी सरपंच प्रविण तापकीर यांच्या पाठपुराव्यामुळे शाळेचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले आहे.काकासाहेब तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बलभिम पठारे, विष्णू तापकीर, राजेंद्र तापकीर, सुनिल तापकीर, प्रकाश पठारे, ज्ञानदेव भालसिंग, अभिजित तापकीर, वैभव तापकीर, शुभम पठारे, अमृत पठारे, चंद्रकांत तापकीर, कुशाबा वायसे, शहाजी पठारे, सतिष भालसिंग, सुरेश पठारे, कुंडलीक पठारे, प्रशांत तापकीर, विठ्ठल तापकीर, अमोल गांगर्डे आदी उपस्थित होते. शाळेतील आकर्षक रंगकाम, रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून बोलक्या भिंती, पुर्ण ग्राऊंडला बसवलेले पेव्हिंग ब्लॉक, शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, डिजीटल क्लास रुम आदींमुळे शाळेचा कायापालट झाला आहे. शाळा आता चकाचक झाली असुन येत्या जूनमध्ये विद्यार्थी या विद्यामंदिराचा लाभ घेणार आहेत. पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
वाकणवाडी वस्तीशाळेचा झाला कायापालट
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:29
Rating: 5