Breaking News

कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी : आदिक


श्रीरामपूर/शहर प्रतिनिधी  - पालिकेतील आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. नगरविकासदिनानिमित्त नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाकडील साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेविका मिरा रोटे, मुख्याधिकारी सुमंत मोरे, डॉ. प्रमोद गाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गांधी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गाडे यांनी कर्मचाऱ्यांना आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. अविनाश सलालकर यांनी आभार मानले.