Breaking News

जॉगिंग ट्रॅकची निगा राखण्यास सुरवात


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- श्रीरामपूर शहरातील जॉगिंग ट्रॅकच्या दुरावस्थेबाबत दै. लोकमंथन मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ट्रॅकची स्वच्छता करण्यास सुरवात झाली असून सरस्वती कॉलनीलगतच्या परिसरातील ट्रॅकलगत जिथे जिथे झाडे पाण्याअभावी वाळून गेली होती तिथं पुन्हा झाडे लावून पाणी घालण्यास सुरवात झाली आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी दैनिक लोकमंथन मध्ये शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकच्या दुरवस्थेबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जॉगिंग ट्रॅकची निगा राखण्यास सुरवात झाली असून यापुढेही ट्रॅकची नियमित काळजी घेण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. सोशल मीडियावरही हे वृत्त सर्वत्र फिरले होते. सरस्वती कॉलनीजवळच्या ट्रॅकलगतच्या झाडांमधील सर्व घाण काढून झाडांना पाणी घालण्यास सुरवात झाली आहे. ज्या ठिकाणी झाडे वाळून गेली होती त्या ठिकाणी पुन्हा नवीन शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. अशाच पद्धतीने संजय नगर रोड लगतचा ट्रॅकवरही झाडे लावून त्यांची निगा राखणे आवश्यक आहे.