Breaking News

वृध्दाश्रमाची आवश्यकता असणे ही मनाला वेदना देणारी बाब

भातकुडगाव (प्रतिनिधी)- सद् शिष्याला सदगुरू देव आहेत. आई वडील आपले खरे दैवत आहे. भारतासह महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून पाहिले जाते. परंतु आधुनिक स्वयंघोषित संत व महाराज मंडळी मात्र स्वतःच वृद्ध आश्रमाची निर्मिती करतात. याचे मनाला मोठे दुःख होते. वृध्दाश्रमाची आवश्यकता असणे ही मनाला वेदना देणारी बाब आहे असे प्रतिपादन सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफताना रघुनाथ महाराज धामनगावकर यांनी केले . शेवगाव नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे नवनाथ बाबाच्या प्रांगणात श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात महाराज बोलत होते. आई आणि वडीलांना वृद्ध आश्रमात पाठवून सुसंस्कृत पणाचा आव आनला जात आहे. कुटुंब पद्धती मध्ये आई दुसर्‍याच्या सुखात सुखच मानत असते. त्यामुळे आई वडलांना बाजूला करून कुटुंब व्यवस्था उभीच राहू शकत नाही. जीवनातील दुःख कमी करायचे असेल तर मुला-मुलींनी आईवडिलांशी व सुनेने सासू सासर्‍याशी व लहानांनी थोराशी कसे वागले पाहिजे याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. 
पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललो आहोत अशी खंत महाराजांनी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाने धर्माबरोबर समाजहित हा मूळ गाभा समजून निस्वार्थीपणे सेवा केली पाहिजे त्यासाठी संतांचे विचार अंगीकृत करून त्यांची जोपासना करणे महत्त्वाचे आहे . ज्याला भूक आहे त्यालाच अन्न खाऊ घाला. सध्याच्या काळात अर्थासाठी परमार्थ करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यांचेच परिवर्तन होणे काळाची गरज आहे. अन्नदानाच्या पंगती या संस्कृतीप्रमाणेच व्हाव्यात त्यातून मानवतेचे दर्शन घडते परंतु सध्या पंगती मधील विदारक चित्र हे समाज व्यवस्थेला अशोभनीय आहे. सध्याच्या लग्नपद्धतीवर कडाडून टीका करतांना महाराजांनी पौराणिक दाखले देऊन समाजाचे वास्तव चित्र श्रोत्या समोर मांडले . यावेळी गहिनीनाथ महाराज आढाव , हरिभाऊ महाराज अकोलकर , दत्तात्रय महाराज कुलट, अविनाश महाराज लोखंडे , महेश महाराज शेळके, प्रतिभा महाराज शेळके , माजी चेअरमन जनार्धन लांडे , शेषराव दुकळे, सदाशिव शेकडे, विठ्ठल आढाव, संजय लांडे , शिवाजी लांडे , कडूबाळ दुकळे, सखाराम लोखंडे , माणिक शेकडे, नानासाहेब दुकळे, बाळासाहेब डमाळे, राजेंद्र आढाव , तुकाराम गायकवाड, विष्णू घाडगे , अण्णासाहेब दुकळे , शिवाजी आवारे, बाप्पूराव दुकळे, बबन शेळके, दगडू दुकळे, रमेश आढाव, राजेंद्र दुकळे, पत्रकार शहाराम आगळे, पंढरीनाथ आढाव , ज्ञानदेव नेव्हल, रामदास शेकडे , गंगाराम नेव्हल, घनश्याम पालवे, पांडुरंग आढाव , हरिचंद्र आढाव , रघुनाथ आढाव, हरिचंद कानडे, सुखदेव शिंदे , लक्ष्मण पवार, सूर्यभान विखे, अण्णा नेव्हल, त्रिंबक पांढरे, श्रीराम शेकडे, यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.