Breaking News

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी ‘बीजेएस’चे लाखमोलाचे योगदान : पालकमंत्री

नगर । प्रतिनिधी - ग्लोबल वार्मिंग, वातावरणातील बदल यामुळे पाण्याच्या दुर्भिक्ष्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली आहे. पाणी फौंडेशननेही या कामात योगदान देण्याचे ठरवून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे. बीजेएस या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना जेसीबी, पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून देत आहे. यातून मोठे काम प्रत्यक्षा साध्य होणार आहे. अशा संघटनांचे सहकार्य व लोकसहभाग यातून येणार्या काळात महाराष्ट्र निश्चित दुष्काळमुक्त होवून गावे समृध्द झालेली दिसतील, असा विश्वास राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.