नगर । प्रतिनिधी - केडगाव दुहेरी खून प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास व घटनेबाबत कोणास काही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणार्यास एक लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.