Breaking News

प्लास्टिकच्या विरोधात धडक मोहीम


पुणे महापालिका प्रशासनाने प्लास्टिकच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून मागील महिनाभरात तब्बल 30 हजार 280 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 8 लाख 47 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमूख सुरेश जगताप यांनी दिली. 

राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांची बंदी केल्यानंतर पा लिका प्रशासनाने शहरात जनजागृती मोहीम सुरू केली होती. त्यानंतरही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री होत असल्याचे आढळले होते. त्यानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने धडक मोहीम हाती घेऊन शहरातील विविध दुकान आणि मॉलमध्ये धाडसत्र सुरू केले. पालिका प्रशासनाने 3 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत प्लास्टिक जप्तीच्या पथकाने तब्बल 30 हजार 280 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच 2 हजार 711 किलो थर्माकोल आणि 2 हजार 167 किलो नोन ओवेन प्रोपिलोन (निम्म्या पेक्षा जास्त प्लास्टिकचे प्रमाण असलेल्या पिशव्या) जप्त के ल्या आहेत.