कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील राजवारा परिसरात असणारा दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने रविवारी ही कारवाई केली. लष्कराच्या या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हांडवारा येथील राजवारा परिसरात त्यांची शोधमोहीम सुरू असताना हे ठिकाण सापडले.
या कारवाईत कोणताही दहशतवादी त्याठिकाणी सापडला नसून रेडिओ सेटस, ग्रनेड लाँचर्स, हात बॉम्ब, एके 47 व 56 रायफल्स आणि मोठ्या माणात काडतूसे येथून जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी 19 एप्रिलला डोडा जिल्ह्याच्या मंजमी गावात केलेल्या शोध मोहिमेत भारतीय लष्कराने अशाच एका दहशतवादी अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. त्या ठिकाणातूनही मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती.