कोल्हापूर : रत्नागिरी जवळील नाणार प्रकल्पावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकी नये असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे ते आज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नाणार प्रकल्पावरून सध्या सुरू असलेले राजकारण योग्य नसल्याचेही पवार म्हणाले. हा प्रकल्प कोकणात झाला नाही तर गुजरातला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले होते. हा प्रकल्प गुजरातला गेला किंवा अन्य राज्यात तरी तो देशातच असेल, गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही असा टोलाही पवार यांनी लगावला. या संदर्भात स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी येत्या 10 मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगतानाच या ठिकाणी सभा घेणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
नाणार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी धमकी देवू नये शरद पवार यांची टीका
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:26
Rating: 5