शिर्डी/प्रतिनिधी - शासन प्रत्येक नागरिकाला शिधापत्रिका दिली जाईल, अशी घोषणा सरकार एकीकडे करते. दुसरीकडे मात्र याच शिधापत्रिका व रेशन कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना राहाता तहसीलमध्ये मोठे हेलपाटे मारावे लागतात. गोर-गरीब व वंचित घटकातील लोक आपला रोजगार बुडवून यासाठी पाठपुरावा करीत असतात. या प्रश्नात राहाता तहसीलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कमीत कमी वेळेत रेशनकार्ड कसे मिळतील, त्यातील अडचणी कशा दूर होतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिर्डी शहर कार्याध्यक्ष अभिषेक शेळके यांनी केली आहे.
सर्वसामान्यांना कमी वेळेत शिधापत्रिका द्या : शेळके
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:45
Rating: 5