Breaking News

कठुआ, उन्नावप्रकरणी महामूकमोर्चा


संगमनेर/प्रतिनिधी- देशाच्या विविध भागामध्ये महिला आणि लहान मुलीवर अत्याचार होत आहेत. स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात आल्याने अत्याचाराच्या घटनांविरोधात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्वधर्मीय महामूकमाेर्चा व निषेधसभेचे आयोजन करण्यात आले होते. या मूकमाेर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. 

कठुआमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर, सुरतमध्ये अकरा वर्षाच्या मुलीवर, उन्नावमध्ये युवतीवर अत्याचाराचे प्रकार समोर आले. त्यानंतर त्याचा निषेध देशभरातुन सुरु झाला. आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे निघाल्याने सरकारच्या भुमिकांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. सय्यदबाबा चौकातुन सुरु झालेला हा मुकमोर्चा शहरातील विविध मार्गावरुन क्रिडासंकूलामध्ये आल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी विद्यार्थ्यांसह विविध समाजाच्या नागरिकांनी झालेल्या घटनेचा जोरदार निषेध करत अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी निवेदन स्विकारले.