Breaking News

वरंवडी शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

आश्वी : प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील वरंवडी फाट्यावरुन कुभांरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पाझर तलावा जवळ एका ३१ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. शोभा बाबासाहेब वाघमारे (वय- ३१, रा. पानगाव माजंरी, ता. नेवासा) यांचा हा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

आज {दि. २०} सकाळी साडेसहाच्या सुमारास वरंवडी येथील संतोष भोसले यांनी पोलिस पाटील नामदेव केदारी यांना वरंवडी फाट्यावरुन कुभांरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पाझर तलावाजवळ एका महिलेचा मृतदेह दिसला. यावेळी केदारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले. यासंदर्भात त्यांनी आश्वी पोलिसाना माहिती दिली. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद करण्यात आली. या महिलेचा मृतदेह याठिकाणी कसा आला, हा खून आहे की आत्महत्या, याबाबत तर्क वितर्काला उधाण आले आहे.