Breaking News

बेलापूर मर्चंट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


श्रीरामपूर,  बेलापूर मर्चंट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रशांत लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमास सरपंच भरत साळुंके, रविंद्र कोळपकर, रवींद्र खटोड, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, रामनाथ शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. पुरुषोत्तम मुंदडा यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची सुरवात केली. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सन 2017-18 चा हिशोब कोषाध्यक्ष संजय राठी यांनी वाचून दाखवला. 

मागील सभेचे इतिवृत्त सचिव कांतीलाल मुथा यांनी वाचून दाखवले. आदर्श व्यापारी पुरस्कार अनिल डाकले यांना जाहीर करण्यात आला. सन 2018 -2019 ते 2023-24 करिता कार्यकारिणी निवड करण्याचे अधिकार प्रशांत लड्डा यांना देण्यात आले. यावेळी विलास मेहेत्रे, लहानू नागले, विशाल वर्मा, गौतम हिरन, श्रीकांत मुंडलिक, राहुल लखोटिया, रितेश मंत्री, विलास नागले, सचिन नगरकर, शेखर डावरे, रामेश्‍वर खंडेलवाल, अमित लुक्कड, अभिजित रांका, जितेंद्र लुक्कड, निलेश दायमा, संतोष ताथेड, गंगाराम साळूंके, नाना देशपांडे, सतीश काळे, हर्षल गांधी, शशिकांत उंडे, किरण गागरे, दर्शन बिहणी, दिलीप दायमा, देविदास देसाई, ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.