Breaking News

जीवनात अंतकर्णातुन माया फक्त आईचीच- बापुसाहेब महाराज माटेगावकर.


भातकुड़गांव  - परमार्थापासुन दुर गेलेल्या मानसाला सुख मिळत नाही. सर्वाचा निर्माता एकच आत्मा आहे. आत्म्याला जात धर्म पंथ नसतो. गुरु देवाच्या रूपाने परमात्मा आपल्या समवेत आहे. आत्मा कधीच भेदभाव करता नाही. प्रत्येकाने व्यावहारीक जीवन जगताना परमार्थ वाढीसाठी अग्रेसर असले पाहिजे. जीवनात सुख प्राप्तीसाठी परमार्थाचे चिंतन मांड़ताना संत निवृत्ती, ज्ञानेश्‍वर, सोपान ,मुक्ताई संसारीक नसूनही इतर संताप्रमाणे सांसारीक सुखप्राप्तीचा मार्ग त्यांनी आपल्या संत वचनातुन प्रकर्षाने मांड़ला. समाजातील वाईट विचारांचे खंड़ण झाल्याशिवाय परमार्थ वाढणार नाही. त्यासाठी वारकरी संप्रदायाने आईची भुमिका बजावून निस्वार्थी परमार्थ वाढीचं कार्य करावे.

कोणत्याही धर्माच्या शिकवणीचा मुळ गाभा हा आई वड़ीलांच्या विचारावरती सहमत आहे. म्हणुनच संत हे आई सारखे अंतकर्णातुन प्रेम करतात. त्यामधे निस्वार्थ भावना आसतेअसे प्रतीपादन सुवर्ण महोत्सवी अंखड़ हरीनाम सप्ताहातील तिसरे पुष्प गुंफताना बापुसाहेब महाराज माटेगांवकर यांनी केले. शेवगाव नेवासा राजमार्गावरील भायगांव येथे नवनाथ बाबाच्या प्रांगणात देवगड़ संस्थान चे मठाधिपती महंत भास्करारिी महाराज यांच्या प्रेरणेने चालु असलेल्या सुवर्ण महोत्सवी सप्ताहात बोलतांना महाराज म्हणाले कि मानसाचे मन निर्मळ झाल्याशिवाय परमार्थाची ताकद वाढणार नाही त्यासाठी समाजाला आशावादी बनवण्याची ताकद परमार्थात आहे. संसारी राहुनही परमार्थ कसा करावा हे अनेक संतांनी त्याच्या कृती बरोबर त्याच्या संत साहित्यातुनही समाजाला दाखवून दिले आहे. भगवंताच्या चरणावर सर्वस्वी अर्पण करून परमार्थी जीवन जगावे असा मौलिक सल्ला त्यानी दिला. 

यावेळी माजी चेअरमन जनार्धन लांड़े, दत्ताञय महाराज कूलट, आविनाश महाराज लोखंड़े ,प्रतिभा महाराज शेळके, महेश महाराज शेळके, हरीभाऊ महाराज आकोलकर, सुभाष महाराज मोरे, राजेन्द्र आढाव, शंकर ठोंबळ,सदाशिव शेकड़े,जालिदर नेव्हल,जगन्नाथ आढाव, दत्ताञय दुकळे,मुरलीधर आढाव, विठ्ठल आढाव, राजेन्द्र दुकळे, संदिप लांड़े,बापुराव दुकळे,बाबासाहेब शेळके, हरीचंद कानड़े ,गोरक्षनाथ काळे,रघुनाथ आढाव, बाबुराव खेड़कर,बबन शेळके, विष्णू घाड़गे,धोड़िराम ढोरकुले,कैलास लांड़े ,रमेश आढाव, विष्णू आढाव, नानासाहेब दुकळे,मुरलीधर कोलते , घनश्याम पालवे, ड़ॉ.धावने,पञकार शहाराम आगळे , अजय माने, हरीचंद घाड़गे, शंकर दुकळे,बाबासाहेब आव्हाड़,गंगाराम नेव्हल यांच्यासह परीसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.