Breaking News

सवलीविहिर येथे पथदिवे बसविले

श्रीरामपूर, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विकास निधीमधून 3 पथदिवे सवलीविहिर गावात देण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात 1 व 2 पथदिवे हे गावात बसविण्यात आले असल्याचे शिवसेना शाखाप्रमुख दिनेश आरने यांनी सांगितले. 

मागील वर्षी 3 लाख 50 हजार रुपयांचे सभा मंडप विकास निधीतून सावलीविहिर गावास देण्यात आले आहे. परिसरात शिवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण असून तरुणाची मोठी संघटना एका विचाराने सामाजिक कामाकरिता एकत्र येतांना दिसत आहे. या प्रसंगी उपतालुका प्रमुख किरण जपे शंकर पवार, अक्षय चव्हाण, प्रवीण आरने, सागर जपे , संदीप विघे, अतुल चव्हाण, ऋषीकेष जपे, विशाल लकारे, कारभारी पाचोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.