संगमनेर प्रतिनिधी - तालुक्यातील निमज येथील आदर्श शेतकरी तसेच आ. बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक तुकाराम गुंजाळ यांना महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शेतकरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शेततळे, ठिबक सिंचन यासह शेतीच्या आधुनिक प्रणाली व अद्यायावत तंत्रज्ञान याद्वारे चांगले उत्पन्न मिळवणारे शेतकरी म्हणून त्यांचा तालुक्यात लौकिक आहे. या पुरस्काराबद्दल गुंजाळ यांचा आ.थोरात यांचच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, अॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, नवनाथ अरगडे , विवेक कासार, लहानभाऊ गुंजाळ, रामहरी कातोरे, पाडूंरंग घुले, आर. बी. राहाणे, संपतराव डोंगरे, रामनाथ डोंगरे, गंगाधर डोंगरे, विजय गुंजाळ , शरद कोकणे आआदी उपस्थित होते. उत्कृष्ट शेतकरी असलेले तुकाराम गुंजाळ हे आ. थोरात यांचे विश्वासू सहकारी आहेत. सामाजिक कार्यातही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. निमज वि. का. सेवा सोसायटीत ते गेल्या १५ वर्षांपासून चेअरमन म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, गुंजाळ यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात आदींसह निमज गावचे ग्रामस्थ आणि संगमनेरवासियांच्यावतीने गुंजाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तुकाराम गुंजाळ यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:26
Rating: 5