Breaking News

बॅडमिंटन गुरुकुल अहमदनगर शहर बॅडमिंटन स्पर्धांचा शानदार शुभारंभ शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद २२६ खेळाडूंचा सहभाग


नगर - श्री.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन व मॅक्सीमस स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने नगर मध्ये प्रथमच बॅडमिंटन गुरुकुल आयोजित सर्वासाठी खुल्या बॅडमिंटन शहर स्पर्धांचा शुभारंभ उद्योजक श्री.नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संदीप जोशी,आभिजीत वैद्य,विजय पवार,उदय थोरात,जितेंद्र कुमार,तेजस पवार,रोहित शर्मा, खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी फिरोदिया म्हणाले कि, स्पर्धेला आतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी स्पर्धेत यशासाठी प्रयत्न केले पाहिजे ,परंतु त्याच बरोबर खेळातून मिळणारा आनंद व समाधान याला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. या स्पर्धेतून चांगले खेळाडू तयार होतील.

संदीप जोशी यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. पहिल्यांदाच आयोजित स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस निश्चित यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.आभार आभिजीत वैद्य यांनी मानले .यावेळी खेळाडू, पालक प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा दोन दिवस होणार असून रविवारी संध्याकाळी पारीतोषिक वितरण होणार आहे.