Breaking News

चांदपीर बाबा यात्रा उत्सवाची जंगी कुस्त्यांनी सांगता


चांदा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील चांदा येथील चांदपीर बाबा यात्रा उत्सवाची (हंगाम्याने) जंगी कुस्त्यांनी सांगता झाली.चांदा येथील जागृत हिंदू मुस्लिम बांधवांचे दैवत चांदपीर बाबा यात्रा उत्सव आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात्रा उत्साहात कुठेही अनुचित प्रकार न होता , सर्व हिंदू मुस्लीम बांधवांनी एकत्रित ह उत्सव पार पाडला तसेच यात्रा उत्सवात कुठलेच सांस्कृतिक व जंगी कुस्त्यांचे या वर्षी नियोजन नव्हते , पण काही कुस्तीपटू व ग्रामस्थ यांच्या आग्रहास्थव जंगी हंगाम्याचे आयोजन दोन दिवसात करून त्या पद्धतीची इच्छाशक्तीनुसार वर्गणी जमा केली व एकदम शांततेत जंगी कुस्त्यांचा हंगामा पार पडला . यावेळी महिला मल्लही उपस्थित होत्या , त्यांच्या देखील कुस्त्या या ठिकाणी झाल्या. औरंगाबाद, बीड, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यातून अनेक मल्लांनी या ठिकाणी कुस्त्यांचे मैदान गाजवले . शेवटी चांदा येथील बंडू गायकवाड या कुस्तीपटूनी इनामी कुस्ती चीतपट केली. यात्रा उत्सवात व कुस्त्यांचा फडात अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोनई पोलीस स्टेशनचे किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड , थोरात व आदी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.