मतीमंद मुलास पळवून नेल्याची तक्रार
श्रीरामपूर ( प्रतिनिधी)- उंबरगाव ता. श्रीरामपूर येथील सोळा वर्षे वयाच्या मतीमंद मुलास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार उंबरगाव येथील रणजीत उमाजी कोळसे यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला दिली असून हवालदार अतुल लोटके हे पुढील तपास करत आहे . उंबरगाव येथील सागर उमाजी कोळसे हा सोळा वर्षाचा मुलगा मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारपासून अचानक गायब झाला. सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्यामुळे त्यास कुणीतरी अज्ञात व्यक्तीनी पळवून नेले असल्याची तक्रार मुलाचे वडील रणजीत कोळसे यांनी पोलीसांना दिली आहे. हा मुलगा मतीमंद आहे. याबाबत पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार अतुल लोटके हे तपास करत आहेत .
