Breaking News

भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांच्या विशेष प्रयत्नातुन निधी उपलब्ध

पाथर्डी (प्रतिनिधी)- लोकनेत्या नामदार पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून व आमदार मोनिका राजळे यांच्या सुचनेनुसार भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांच्या विशेष प्रयत्नानातून पाथर्डी तालुक्यातील विविध विकास कामासाठी निधी मंजूर झाला असुन या निधीचा लाभ 18 गावांना मिळणार असल्याची माहिती अमोल गर्जे यांनी दिली. भाजपा युवा मोर्चचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांची खालील अठरा गावातील लोकांच्या लोकप्रतिनिधिनी भेट घेत गावासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असता याचा पाठपुरावा करत अमोल गर्जे यांनी नामदार पंकजा ताई मुंडे यांच्याकडे विशेेष प्रयत्न करून या गावांना निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती दिली.

गावातील विकास कामासाठी आलेला निधी पुढीलप्रमाणे मजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील जिरेवाडी येथील स्मशानभूमीसाठी 5 लाखाचा निधी, सोनोशी येथील सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 7 लाख, निपाणी जळगाव येथे सामाजिक सभागृहला 7 लाख, मुगुसवाडे येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण साठी 5 लाख, एकनाथवाडी येथे मायबा देवस्थानाजवळ पेव्हर ब्लॅकसाठी 10 लाख, धायतडकवाडी येथे सामाजिक सभागृहला 7 लाख, आगसखाड येथे सामाजिक सभागृहला 7 लाख, खरमाटेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 7 लाख, ढाकाणवाडी येथे अंतर्गत सिमेंट काक्रीटीकरणला 5 लाख, जांभळी येथे सामाजिक सभागृहाला 7 लाख, किर्तनवाडी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 7 लाख, जवळवाडी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 10 लाख, मालेवाडी येथे सामाजिक सभागृहला 7 लाख, मोहरी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 7 लाख, दुलेचांदगाव येथील चौकाचे सुशोभिकरण साठी 5 लाख असा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती गर्जे यांनी दिली