श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी /_ श्रीरामपुर येथील टेलीफोन भवन मध्ये रात्री तिन ते साडेतीन दरम्यान शॉर्टसर्किट मुळे आग लागली. तेथील टेलीफोन बिल भरणा केद्रांतील प्रिंटर, फॅन व इतर वस्तू आगीत जळाल्या. रात्री गस्त घालणार्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. येथील सुरक्षा रक्षक रात्री गस्त घालत असताना सदर प्रकार त्यांचे लक्षात आला व तात्काळ अधिकारी व वायरमन यांना माहीती देऊन विज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेथील कागदपत्रे व चिज वस्तु बाहेर काढण्यात आल्या. कार्यालयात भिषण आगी मुळे प्रिन्टर, फॅन व इतर साहित्य जळुन खाक झाले. सुरक्षा रक्षक वायरमन व काही अधिकारी यांनी प्रसंगावधान राखुन आग आटोक्यात आणली. वायरमन व सुरक्षा रक्षक यांचे अधिकारी वर्गाने कौतुक केले. सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला . अग्निशमन चे गिरी यांनी भेट देउन घटनेची माहीती घेतली व पाहणी केली. सदर घटनेची पोलीस स्टेशन मध्ये आज दुपारपर्यंत कोणतेही नोंद झालेली नव्हती.
श्रीरामपुर टेलीफोन कार्यालयात आग, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:15
Rating: 5