Breaking News

शिल्लक निधीवर ताव मारण्यासाठी दत्तु गितेंनी लढवली शक्कल

भिवंडी/प्रतिनिधी - पाच टक्क्यांप्रमाणे कमीशन लाटता यावे म्हणून मावळत्या आर्थिक वर्षाचा निधी शासनाला परत न करता नव्या आर्थिक वर्षात वापरण्याची क्लुप्ती शाखा अभियंता दत्तु गितेंनी शोधली. जुन्या निधीवर नवीन कामे आणि पुन्हा चालू आर्थिक वर्षाचा निधी खर्ची पाडण्यासाठी या झालेल्या कामांसाठी प्रस्तावित करण्याचा जुना फंडा दत्तु गितेंनी योजला असल्याची माहीती पंचायत समितीतील खास सुत्रांनी दिली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्रालयाकडून विविध विभागांसाठी आर्थिक वर्षातील खर्चाचे नियोजन केले जाते. 1 एप्रील ते 31 मार्च या कालावधीत प्रस्तावित केलेल्या कामांवर हा निधी खर्च व्हावा, अशी साधारण अपेक्षा असते. संबंधित आर्थिक वर्षात तो निधी खर्च झाला नाही तर 31 मार्चनंतर तो निधी शासनाकडे वर्ग करून 1 एप्रील नंतर नवीन आर्थिक वर्षाच्या निधीवर पुढील कामे प्रस्तावित करायचे असतात. सर्व शासकीय विभागांची ही सर्वसाधारण कामकाजाची शैली आहे. तथापी काही चाणाक्ष अधिकारी शासनाला हा शिल्लक निधी परत न करता जुन-जुलै पर्यंत शिल्लक निधी वापरून नव्या आर्थिक वर्षात कामे करतात किंवा हा निधी कामांवार खर्च झाल्याचे दप्तरी दर्शवतात. आर्थिक वर्षाच्या मध्यावर पुन्हा नवीन वर्षात आलेला निधी ही कामे नव्याने प्रस्तावित करून खर्च दाखवतात.कित्येकदा ही जुना आणि नवीन निधी खर्च करून दाखवलेली अनेक कामे केवळ कागदावर असतात, किंवा एकदा काम करावयाचे आणि दुसर्‍यांदा केवळ कागदावर खर्च दाखवायचा अशी या मंडळींची कार्यपध्दती आहे. भिवंडी पंचायत समितीला मिळालेल्या निधीच्या बाबतीतही शाखा अभियंता दत्तु गिते यांनी हीच पध्दती अवलंबली असल्याचे दस्त उपलब्ध झाले आहेत.
शाखा अभियंता आणि चुगलखोरीवर मिळवलेले उपअभियंता या दोन्ही पदांच्या अधिकाराचा दुरूपयोग करून दत्तु गिते दोन्ही बाजूने शासनाला लुटत असल्याचे हे दस्त सांगतात. मार्च अखेर शिल्लक असलेला निधी शासनाला परत न पाठवता या निधीवर जुन-जुलै पर्यंत कामे करण्याचा गेल्या काही वर्षात वापरलेला फंडा दत्तु गिते या वर्षीही अंमलात आणणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
दत्तु गिते यांच्या कार्यपध्दतीविषयी मिळालेली माहीती अशी की, गेली सोळा वर्ष भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम (इ व द) मध्ये कार्यरत राहण्यासाठी केलेले बहुतांश उद्योग सर्वश्रूत आहेत. शाखा अभियंता पदाचा पदभार सांभाळत असताना उपअभियंतासारख्या वरिष्ठांची कटकट नको,उपविभागात स्वैरपणे वावरता यावे म्हणून हे पद सतत रिकामे राहील यासाठी सातत्याने कपट कारस्थान केले आणि उपअभियंता पदाचा प्रभारही स्वतःकडे राहील, अशी परिस्थिती निर्माण केली. गेल्या तीन वर्षापासून शाखा अभियंता ही पात्रता असलेल्या दत्तु गिते यांनी उपअभियंता या पदाचे अपहरण केले आहे.
शाखा अभियंता आणि उपअभियंता हे दोन्ही पदभार असल्याने आदेश आणि अंमलबजावणी दत्तु गिते यांनी केली. कंत्राटदार आणि अन्य लाभार्थ्यांकडून मिळणारे कमीशन शाखा अभियंता दत्तु गिते आणि उपअभियंता दत्तु या दोघांच्याही पदरात पाडून घेतले जाते.(क्रमशः)
सोमवारपासून