Breaking News

एक कोटीचे प्रकरण चर्चेत ऑफर कंत्राटदाराची की अभियंत्यांची?

मुंबई/ विशेष प्रतिनिधी। मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी उपविभागातील अपहाराला जबाबदार असणार्‍या अभियंत्याविरूध्द कारवाई शासन आदेशावर शहाजोगपणा दाखवणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचे पितळ उघडे पडले असून भ्रष्टाचाराच्या बदल्यात भ्रष्टाचार असा नवा प्रोग्राम राबविल्याचे उघड झाले आहे. 

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या अनेक भ्रष्टाचाराला समर्पीत अशी कारकिर्द असणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचे आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणात अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी अधिक्षक अभियंता पदावर काम करीत असतांना साबां मंत्रालय प्रमुखाचे अधिकार अनाधिकाराने वापरण्याचे धाडस दाखवले आहे. हे धाडस दाखवतांना एक कोटी रूपयांचे उत्पन्नही अवघ्या सात दिवसात कमावल्याची वाच्छता प्रकरणाचे गांभिर्य वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील आमच्या खास सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, सध्या निवृत्त असलेले ए. जे. पाटील यांनी मध्य मुंबई साबांचे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतांना अवघ्या तीन महिन्यात 24 कोटींच्या शासकीय निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचे प्रकरण आ. चरणभाऊ वाघमारे आणि आ. प्रशांत बंब यांनी उघडकीस आणले होते. स्वपक्षिय आमदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत पुरावे उपलब्ध होऊन दोषारोप सिध्दही झाला. चौकशी अहवालावर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले. या आदेशात चौकशी अहवालात नमुद असलेल्या सर्व दोषी अभियंत्यांविरूध्द वरळी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश होते.
हे आदेश प्राप्त झाल्यानंतर मुख्य अभियंत्यांनी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना कारवाईचे निर्देश दिले. अरविंद सुर्यवंशी ही कारवाई करण्याची जबाबदारी मध्य मुंबईचे क ार्यकारी अभियंता एच. के. पाटील यांच्या 12 मार्च 2018 रोजी एका पत्रान्वये सोपविली.
एका बाजूला अरविंद सुर्यवंशी कार्यकारी अभियंता एच. के.पाटील यांना आदेशीत करून भ्रष्टाचारावर ते स्वतः गंभीर आहेत, असा आभास निर्माण केला तर दुसरीकडे मुंबई दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्यासोबत पाचव्या माळ्यावर बैठक घेऊन त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. चामलवार आपल्या भुमिकेवर ठाम आहेत हे लक्षात आल्यानंतर सुर्यवंशी यांनी चामलवार यांना या 24 कोटीच्या अपहार प्रकरणात कुणी किती अपहार केला याविषयी वर्गीकरण देण्याचे पत्र दिले. चामलवार यांनी सुर्यवंशी यांची ही इच्छाही पुर्ण केल्याने वेळ मारून नेण्याचा सुर्यवंशींचा हा प्रयत्नही फसला.
दुसर्‍या दिवशी म्हणजे 13 मार्चपासून अरविंद सुर्यवंशी यांनी 18 मार्चपर्यंत वरळी उपविभागात तळ ठोकला. या सात दिवसात अरविंद सुर्यवंशी यांनी संबंधितांसोबत प्रकरण सौम्य क रण्याच्या दृष्टीने वाटाघाटी केल्या. शासन आदेशात ए. जे. पाटील यांच्यासह या तत्कालीन प्रकरणात सहभागी असलेले सर्व सहअभियंते आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी दाखल करावी, असे स्पष्ट निर्देश होते.तथापी सात दिवसाच्या वरळी मुकामात अरविंद सुर्यवंशी यांनी या शासन आदेशाची चिरफाड केली आणि कंत्राटदारांसह अन्य सहअभियंत्यांची नावे वगळून निवृत्त झालेले कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील आणि भादुर्गे यांनाच आरोपी ठरवणारा नवा आदेश स्वअधिकारात काढला. हा आदेश काढण्याचा अधिकार नसताना अरविंद सुर्यवंशी यांनी केलेला शहाजोगपणा साबांत कळीचा मुद्दा ठरला आहे. हा आदेश काढण्याचे धाडस एक कोटीच्या बदल्यात दाखवले ही चर्चा हे प्रकरण आणखी गंभीर होण्यास कारणीभुत ठरली असून त्यानंतर साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी बोलावलेली बैठक या प्रकरणाचे गांभिर्य अधोरेखीत करते.
साबांचे अवर सचिव संपत सुर्यवंशी, कक्ष अधिकारी गो. भा. शिंदे, अ. पा. मोहीते, मुख्य अभियंता केडगे हे उपस्थित असलेल्या या बैठकीत अरविंद सुर्यवंशी या मुद्यावर गंभीर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

हायब्रीड अ‍ॅन्यूटीच्या बारशाला
23 हजार कोटीची बिदागी
भ्रष्टाचाराच्या दक्षिणेवर उपजिविका करणारे बांधकाम सचिव सी. पी. जोशी, लवासातून हाकललेला आचार्य, मराठवाड्यातील भ्रष्टाचार अपचन झाल्यानंतर तोंड लपवत फिरणारे धोंडगे आणि चंद्रकांत दादांसोबत सावलीसारखे वावरूनही प्रतिष्ठेला दंश करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या चौकडीच्या अभद्र युतीचा कारनामा... 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा...
असंगाशी संग झाला तर उत्पत्ती सदोषच निपजणार हा निसर्ग नियम आहे. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत वचन म्हणूनच अनन्य ठरले आहे. बुध्दी भ्रष्ट झाली की वर्तनही भ्रष्ट होते. संपत्तीचा सोस बुध्दी भ्रष्टतेचे प्रमुख कारण आहे, हाच हव्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंत्याच्या बुध्दी भ्रष्टतेला कारणीभूत ठरला असून बुध्दीभ्रष्ट अ भियंत्यांचे वर्तनही भ्रष्ट बनले आहे. याच भ्रष्ट बीजाला पोसले गेल्याने सार्वजनिक विभागात भ्रष्टाचाराला मांडीवर खेळवणारे नवे बाळ जन्माला घातले गेले आहे.
हायब्रीड अ‍ॅन्यूटी... या बाळाच्या बारशालाच तब्बल 23 हजार कोटीच्या गैरव्यवहाराची अंगाई गायीली गेली आहे. या बारसे सोहळ्याचे मानकरी आहेत, अर्थातच बांधकाम सचिव सी. पी. जोशी, कधीकाळी जामीनासाठी पार्श्‍वभागाला पाय लावून पळणारे धोंडगे आणि झाल पळवणारा, लवासातून हुसकावून लावलेला नेटकरी शाखा अभियंता आचार्य. विशेष म्हणजे बांधकाम मंत्र्यांची सावली म्हणून स्वतःला प्रमोट करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे देखील या बारशाच्या समारंभाचे प्रमुख निमंत्रक आहेत. या निमंत्रकांची सातारा एसटी आगार प्रमुख म्हणून कार्यरत असतांना झालेला भरती घोटाळा ते निवृत्तीपर्यंत आणि निवृत्तीनंतर दादांचे खासगी सचिव म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यापासून आज पर्यंतची साबांतीला कर्मकुंडली दररोज तपशीलात...