Breaking News

मोचेमाडमध्ये 52 कासव पिल्लांना समुद्रात सोडले

सिंधुदुर्गनगरी, दि. 11, एप्रिल - मोचेमाड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने लावलेल्या चौथ्या घरटयातून 52 कासव पिल्ले बाहेर निघाली. या पिल्लांना  सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या उपस्थितीत वन कर्मचारी व मच्छीमारांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.
मोचेमाड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने लावलेल्या चौथ्या घरटयाची देखभाल मोचेमाड ग्रामस्थ विठोबा आरावंदेकर व गणपत खवणेकर यांनी केली. या  घरटयातून काल पहाटे 52 कासव पिल्ले बाहेर निघाली. सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनरक्षक सावळा कांबळे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात  आले.