Breaking News

अग्रलेख - कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !

दुसर्‍यांचे कल्याण व्हावे अशा हेतूने एखादी वस्तू, सेवा आणि हक्क यापैकी एखादी गोष्ट देणे म्हणजेच दान होय. दान देतांना दान देणार्‍याची भावना ही स्वार्थाची नसते. स्वार्थ त्यागातूनच दान केले जाते. म्हणून मानवी समाजात दान भावना ही सर्वोत्तम असते. दान हे त्या व्यक्तीला फार काही मिळवून देत नाही, मात्र अनेक व्यक्तींनी मिळून दान दिले, तर त्यातून देशातील जनतेचे कल्याण करणारी व्यवस्था अस्तित्त्वात येईल अशी भावना असते. हि भावना जोपासण्याचे काम दान करणारांना तर करावे लागेलच पण या दानाला क धीही कलंक लागू नये याची काळजी घ्यावी लागेल. दान करतांना तो हक्क दान केला जातो. त्यातून आपल्या देशाच्या, राज्याच्या जनतेचे कल्याण साधणारी ्रव्यवस्था अस्तित्त्वात यावे अशी भावना असते. या भावनेला ठेच लागू नये, अन्यथा देशात अशा प्रकारच्या दानासाठी जनता पुढे येणार नाही. दान करतांना प्रत्येकच्या मनात येणारे नवे लोक आपले क ल्याण करेल असा विचार किंवा भावना असते. कायद्याच्या दृष्टीकोनातूनही हि भावना बाळगणे निश्‍चितच उत्तम आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून दानाच्या संदर्भात अनुत्साही होत असल्याचे दृष्य दिसून येत होते. मात्र विद्यमान दानासाठी मोठ्या प्रमाणावर टक्केवारी वाढली आहे. या टक्केवारी वाढण्याची कारणे अनेक असली तरी सोशल मिडियाचा अवलंब करणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात दानासाठी पुढे आली आहेत. हे अधिक ठळक आणि महत्त्वाचे कारण आहे. नव्या तरुणांची विचारसरणी अजून कळलेली नाही. त्यामुळे या निवडणूकीचा अंदाज लावणे निश्‍चितच कठीण आहे. मात्र खासगी आपल्याला मानसिकताच नव्हे तर वस्तूस्थिती कळल्याचा दावा करीत आहेत. तरुण पिढी ही अत्यंत चाणाक्ष असल्यामुळे भल्या-भल्यांना ते आपले मत कळू देत नाहीत. त्यामुळे विद्यमान संदर्भात त्यांचा विचार किंवा मत नेमकं काय आहे याचा अंदाज बांधणे कठिण आहे.  दान करतांना चर्चांवर विसंबून न करता आपल्या विवेकशिल बुध्दीला पटेल त्यानुसारच दान करावे. कोणतेही दान करतांना आपल्या अंर्तमनाला त्याचे महत्त्व पटले पाहिजे. त्याशिवाय केलेले दान व्यर्थ ठरु शकते. नैतिकता ओलांडली आहे. एकमेकांवर चिखलफेक करतांना सामान्य जनतेची तमाच बाळगली पाहिजे. त्यामुळे कोणालाही गृहित धरुन आपल्याला हवे तसे तंत्र राबविणारे सर्वच चूकीस पात्र आहेत. सर्वसामान्य माणूस आपली वर्तणूक समाजातील वरच्यास्थानी असणार्‍या लोकांकडे पाहून निश्‍चित करीत असतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव सामान्य माणसांच्या वर्तणूकीवर पडत असतो. याचे प्राथमिक भान जरी पाळले तरी बरेच काही साध्य होवू शकते. अर्थात आजच्या निर्णायक घडीला सामाजिक वर्तणूकीतून आपल्या मतदानाचा हक्क दान करणे टाळू नये. दान हे देशातील आणि राज्यातील सर्व जनतेच्या कल्याणाच्या भावनेतून केले जावेे. किंबहूना ते त्याच भावनेने केले जावे. पण देशात खर्‍या अर्थाने जनकल्याणकारी व्यवस्थेची स्थापना व्हावी या उदात्त हेतूनेच दान करावे. कोणत्याही परिस्थितीचा विचार करतांना त्यांची विचारसरणी देशाच्या संविधानाशी जुळते का? याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. सार्वभौम देशाचे अस्तित्व हे संविधानावरच अवलंबून असते. संविधान नसेल तरे कोणत्याही देशातील जनता त्यांनी आपसातील व्यवहार काय करावा, कसा करावा, त्याचप्रमाणे समाज व्यवस्थेतील वेगवेगळ्या संस्थांचे त्यांच्या विषयी जबाबदारी आणि कर्तव्य काय याचे ताळतंत्र राहणार नाही. परिणामी देशात अराजकता निर्माण होवून सर्वसामान्य माणसाचे अस्तित्त्वच धोक्यात येवू शकते. म्हणून दान करतांना आपले आणि देशाचे सार्वभौमत्व अखंड राहील याचा प्राधान्याने विचार करावा.