Breaking News

जिल्हा बँकेचे अधिकारी शामराव पठाडे सेवानिवृत्त

नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - जिल्हा बँकेचे नेवासा शाखेतील अधिकारी शामराव दशरथ पठाडे हे 28 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीबद्दल नेवासा बँक शाखेत झालेल्या कार्यक्रमात पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक भुजंग फुलारी, दिलीप फटांगरे, शंकर कांबळे, गणेश मोढवे, नजीर शेख, अरुण धनक, अर्जुन सरोदे, दीपक देशमुख, अंबादास इरले आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.शामराव पठाडे यांनी अठ्ठावीस वर्षाच्या सेवेत तत्परतेने व प्रामाणिकपणे सेवा केली जिल्हा बँकेच्या सेवेतील त्यांचे कार्य कौतुकास्पद असे राहिले असे गौरवोदगार शाखा व्यवस्थापक भुजंगराव फुलारी यांनी यावेळी बोलतांना काढले. सेवानिवृत्तीबद्दल शामराव पठाडे यांचा विविध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.