Breaking News

संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी : प्रकाश आंबेडकर


कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामधील पीडित तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या प्रकरणामधील पीडित मुलीच्या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही याबद्दल नाराजीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.