Breaking News

राज्यस्तरिय वाड्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन


भेंडा - नेवासा तालुक्यातील चीलेखनवाडी येथील शासनमान्य जनता सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान मराठी भाषेतील प्रकाशित उत्कृष्ट साहित्यकृतीस पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थापक प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी दिली. 

कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, चरित्रग्रंथ, आत्मचरित्र, बालसाहित्य, ललित, वैचारिक, संशोधनपर ग्रंथ या वाड्मय प्रकारातील पुस्तकाच्या दोन प्रती, परिचय, फोटो यांसह प्रस्ताव कार्यवाहक, जनता सार्वजनिक वाचनालय, चिलेखनवाडी पो. जेऊर हैबती ता. नेवासा जि. अहमदनगर या पत्यावर 30 एप्रिल 2018 पर्यंत पाठवावेत. असे आवाहन समन्वयक सुनील गोसावी यांनी केले आहे.