आश्वी खुर्द येथे श्री संत बस्वेश्वर महाराज यांची जंयती उत्सहात साजरी.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे श्री संत बस्वेश्वर महाराज यांची जंयती उंबरेश्वर रामेश्वर देवस्थानांचे मठाधीपती मंहतं दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थित मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मंहतं दत्तगिरी महाराज म्हणाले की, १२ व्या शतकात भारतामध्ये अनेक रुढी, पंरपरा, अधंश्रध्दा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्री दास्यत्वं, जातीयता या गोष्टीमुळे समाज मरगळलेल्या अवस्थेत होता. यावेळी संत बस्वेश्वर यानी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. भारताच्या धांर्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा बस्वेश्वर यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यानी शोषण, जातीभेद, जातीभेद याविरुध यंशस्वी लढाई लढली. समाजातील गरीबी व विषमता दूर करत समाज अर्थिक बाबतीत समृध्द करण्यासाठी ‘ कायक वे कैलास ’ व ‘ दासोह ’ सारख्या दोन क्रांतीकारक संकल्पना आपल्याला दिल्या असल्याचे मंहतं दत्तगिरी महाराज यांनी याप्रसंगी सागितले आहे.
दरम्यान यापवेळी सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, हभप व्ही. डी. वर्पे, पोलिस पाटील बापुसाहेब गायकवाड, दिगंबर वाळेकर, उमेश मोडसे, महेश तक्ते, प्रा. शिवनाथ तक्ते, मेजर दिलीप तक्ते, देविदास वाळेकर, नरहरी डहाळे आदिसह महिला, तरुण, ग्रामस्थं व संत बस्वेश्वर महाराज यांचा भक्तं परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.