रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
राहुरी, देवळाली प्रवरा येथील शेतकरी मछिंद्र उर्फ बारकू यादव काळे (वय ५५) यांच्यावर राहुरी तालुक्यातील येथील जातप येथे रानडुकराने हल्ला केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
देवळालीप्रवरा, लाख रस्ता, मुसमाडे वस्ती येथील काळे हे जातप येथील त्यांच्या शेतातील ऊसाच्या पिकास पाणी धरीत होते. यावेळी रानडुकराने अचानक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी {दि. १८} सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. याबाबत राहुरीचे वनअधिकारी वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हे अधिकारी जतन केलेल्या फोननंबरशिवाय अन्य नंबरवरुन आलेले फोन घेत नाहीत, असे वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.