Breaking News

अत्याचारी नराधमांना तात्काळ फाशी द्या


राहुरी, देशात एकीकडे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा नारा दिला जात आहे. दुसरीकडे अत्याचाराने महिलाभगिनी त्रस्त आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, तीही भरचौकात म्हणजे कोणीही अशा घटना करण्यास धजावणार नाही, असा सूर राहुरी शहरात काढण्यात आलेल्या ‘कँडल मार्च’मध्ये उमटला. 
कठूआ जम्मू काश्मिर, उन्नाव उत्त्तर प्रदेश आणि सुरत, गुजरात येथील माणुसकीला काळिमा फासणा-या घटना समोर आल्यात आहेत. देशाची मान जगभरात खाली गेली याबाबत केंद्रात सत्तेवर असणारे सरकार याला जबाबदार असून अल्पवयीन मुलींवर अनन्वीत अत्याचार करुन त्यांच्या देहाची विटंबना करणारे नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

याप्रसंगी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करुन सरकार अशा घटनांबाबत जागरुक नसल्याने स्त्री अत्याचार वाढत असल्याचा आरोप केला. याप्रसंगी छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, डॉ. राहुल शेटे, ईमदाद पठाण, डॉ. जाकीर परवेज सय्यद,फहिम शेख, नगरसेविका अर्चना तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, महेश वराळे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर पो. उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले यांना निवेदन देण्यात आले.