Breaking News

सततच्या विकास कामांतून साकूर विकासाचे मॉडेल - आ. थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) - स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य शेतकर्‍यांना खूप चांगले दिवस होते. पण आत्ताच्या भाजप सरकारच्या काळात शेतकर्‍यांची काय दयनीय अवस्था झाली आहे हे तुम्ही सर्वजण पाहत आहात. दुष्काळग्रस्त तालुका असूनसुद्धा तालुक्यातील सततच्या विकास कामांमुळे संगमनेर तालुका रायात आघाडीवर असून साकूर हे गांव विकासाचे मॉडेल ठरले असल्याचे प्रतिपादन रायाचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमीपूजन प्रसंगी कार्यजक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.नगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर होते. तर व्यासपिठावर आ.डॉ.सुधीर तांबे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे, आर.एम.कातोरे, मिलिंद कानवडे, पं.स.सभापती सौ.निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, उपसभापती सतीष कानवडे, युवा नेते इंद्रजित खेमनर, बाबा ओहोळ, पं.स.सदस्या संगिता कुदनर, सुभाष आहेर, बाजार समितीचे सचिव सतिष गुंजाळ, साकूर गावच्या सरपंच सौ.नंदाताई खेमनर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार गावचा कायापालट केला आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श सरपंच म्हणून पोपटराव पवार यांचे नाव आदराने घेतले जात आहे. तशाच पद्धतीने आता शंकरराव खेमनर व स्वर्गीय अशोकराव खेमनर यांनी साकूर गावचा कायापालट केला आहे. त्यामुळे पवार नंतर महाराष्ट्रात शंकरराव खेमनर यांचेही आदर्श सरपंच म्हणून नाव घेतले जावू लागले आहे. आता त्यांनी साकूर पुरते मर्यादित न राहता गावो गावच्या सरपंचांना मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे असे सांगत पुढे जाऊन आ. थोरात म्हणाले की, आज साकूर ग्रामपंचायतीने भव्य अशी बसस्थानकाची इमारत उभारली आहे. त्याचबरोबर या इमारतीमध्ये मुक्कामी राहणार्‍या एस.टी.बस चालक व वाहक यांच्यासाठीही राहण्याची अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. खजया अर्थाने ही कौतुकास्पद बाब आहे. गोरगरीब शेतकर्‍यांनी पिकवलेल्या कुठल्याच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेला हे भाजप सरकार जबाबदार आहे. टाकलेली प्रत्येक जबाबदारी ही आपण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे. मतदारसंघ खूप मोठा आहे. पण तरीही आपल्याला जास्तीत जास्त चांगले काम कसे करता येईल. त्यासाठी यशोधन कार्यालय काम करत आहे. या माध्यमातून 48 लोकांच्या नेमणुका आपण केल्या आहेत. त्यामुळे कोणाचेच काम अडणार नाही ही आपण काळजी घेत आहोत असेही आ. थोरात यावेळी म्हणाले.