Breaking News

नवीन औद्योगिक धोरण लवकरच : सुरेश प्रभू

गुरूग्राम : ग्रामीण भागात उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन देणारे नवीन औद्योगिक धोरण लवकरच येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. पंचायती राज दिवसाच्या औचित्याने आयोजित एका सभेला संबोधित करताना प्रभू यांनी सांगितले, की सोमवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत त्यांना नवीन धोरणाविषयी सल्ला मागण्यात आला. लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या केंद्र व राज्याच्या प्रयत्नांना लघु उद्योगांशी जोडायला हवे. यासाठी दिल्लीत मोठे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात नवीन धोरणाविषयी चर्चा करून सगळ्यांच्या सल्ल्याने त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. केंद्रीय मंत्रिमडळाच्या मंजुरीनंतर लगेच या धोरणाचा अवलंब क ऱण्यात येईल, असे यावेळी बोलताना प्रभू यांनी सांगितले.