Breaking News

मालेगाव बॉम्बस्फोट : निकाल निश्‍चितीच्यावेळी प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे मत

नवी दिल्ली - बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (युएपीए) खटला चालविण्यास मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल निश्‍चितीच्यावेळी प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित याच्यावर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (युएपीए) खटला चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देणारी कर्नल पुरोहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली होती. त्यानंतर पुरोहित याने उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.